मालवणी सुरमई करी / malvani fish curry




साहित्य –

१. सुरमई ४ काप
२. अर्धे खवलेले नारळ  
३. लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ
४. मालवणी मसाला
५. तिखट अर्धा चमचा
६. कांदा १
७. काश्मिरी मिरच्या ४
८. कोथिंबीर पाव वाटी
९. लसूण पाकळ्या ५
१०. आले एक छोटा तुकडा
११. तेल ७ चमचे
१२. हळद पाव चमचा
१३. मीठ चवीनुसार
१४. मोहरी पाव चमचा
१५. जिरे पाव चमचा 

कृती –

एका वाटीत पाणी घेऊन त्यात लाल मिरच्या अर्धा तास भिजवून ठेवणे. मासा धून स्वच्छ करून घेणे. पाणी निथळून टाकणे. मास्याला थोडी हळद, मीठ, लिंबू लावून अर्धा तास फ्रीज मध्ये झाकून ठेवणे. मग सर्व पाणी काढून टाकणे. एका तव्यावर २ चमचे तेल घेऊन मासा दोन्ही बाजूंनी भाजून घेणे. मिक्सरच्या भांड्यात नारळ, भिजवलेल्या लाल मिरच्या, आले, लसूण पाकळ्या, कांदा बारीक वाटून घेणे. एका भांड्यात ५ चमचे तेल तापवून त्यात मोहरी, जिरे तडतडू देणे. त्यात वरील वाटण टाकून चांगले ३ मिनिटे परतून घेणे. आता त्यात हळद, तिखट, मालवणी मसाला टाकून तेल सुटेपर्यंत परतून घेणे. आता आवश्यकतेनुसार पाणी सोडून त्यात चिंचेचा कोळ, मीठ टाकून उकळी येऊ देणे. मग मास्याचे काप सोडून अर्ध्या मिनिटाने gas बंद करणे. वरून कोथिंबीर पेरून गरम भाताबरोबर सर्व्ह करणे.

Comments