ब्रोकोली पराठा / broccoli paratha




साहित्य –

१. ब्रोकोली एक मोठे फुल
२. कांदे २
३. मिरच्या ५-६
४. आले पेस्ट अर्धा चमचा
५. तेल आवश्यकतेनुसार
६. कणिक ४ वाट्या
७. मीठ चवीनुसार
८. कोथिंबीर अर्धी वाटी 

कृती –

ब्रोकोली धून किसून घेणे. एका कढईत २ चमचे तेल तापवून त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या व कांदे परतवून घेणे. आता त्यात आले पेस्ट टाकून अर्धा मिनिट परतवणे. किसलेली ब्रोकोली व मीठ टाकून ३-४ मिनिटे शिजवणे. मिश्रण पूर्णपणे कोरडे होऊ देणे. gas बंद करून कोथिंबीर टाकून मिक्स करणे. थंड होऊ देणे. कणकेत मीठ टाकून थंड पाण्याने सैलसर भिजवून गोळा करून घेणे. आता वरील मिश्रण कणकेच्या पारीत भरून गोळा लाटुन घेणे. तव्यावर तेल टाकून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून गरम गरम दह्याबरोबर सर्व्ह करणे.

Comments