दाल बाटी चुरमा / daal bati churma




साहित्य –

१. कणिक ४ वाट्या
२. ओवा १ चमचा
३. मीठ चवीनुसार
४. साजूक तूप आवश्यकतेनुसार
५. सोडा अर्धा चमचा
६. पिठीसाखर अर्धी वाटी
७. हरबरा डाळ पाव वाटी
८. उडीद डाळ सोललेली अर्धी वाटी
९. मुग डाळ सोललेली अर्धी वाटी
१०. तूर डाळ अर्धी वाटी
११. कोथिंबीर अर्धी वाटी
१२. कांदा १
१३. टमाटा १
१४. हिरव्या मिरच्या ४
१५. आले लसूण पेस्ट अर्धा चमचा
१६. मोहरी पाव चमचा
१७. जिरे पाव चमचा
१८. हिंग पाव चमचा
१९. हळद अर्धा चमचा
२०. तिखट आवश्यकतेनुसार
२१. तेल ३ मोठे चमचे 

कृती –

परातीत कणिक घेऊन त्यात मीठ, ओवा, सोडा व ३ चमचे तूप टाकून कालवून घेणे व कणिक पाण्याने घट्ट भिजवून घेऊन अर्ध्या तासाकरता झाकून ठेवणे. सर्व डाळी धून त्यात पाणी, हळद, अर्धा चमचा तेल टाकून कुकरमध्ये शिजवून घेणे. डाळीला फोडणी देण्यासाठी एका पातेल्यात तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे तडतडू देणे. मग त्यात हिंग, हळद, चिरलेला कांदा, मिरच्या, आले लसूण पेस्ट टाकून २ मिनिटे परतणे. मग तिखट टाकून शिजलेली डाळ घोटून टाकणे. जास्त पातळ करू नये. डाळ थोडी घट्ट ठेवणे. उकळी आल्यावर मीठ व कोथिंबीर टाकून gas बंद करणे.
       बाटी करण्यासाठी भिजवलेल्या कणकेचे छोटे छोटे गोळे करून मध्ये बोटाने थोडेसे दाबणे. जेणेकरून बाटी आतपर्यंत शिजेल. अश्या सर्व बाट्या तयार करून घेणे. आता मायक्रोवेव्ह मध्ये मेडियम टेम्प्रेचर वर १० मिनिटे होऊ देणे. पलटवून परत १० मिनिटे होऊ देणे. आता चुरमा करण्याकरता त्यातील तीन बाट्या घेऊन त्याचे तुकडे करून मिक्सर मध्ये बारीक करणे. थोडे रवाळ ठेवणे. त्यात पिठीसाखर टाकून ४-५ चमचे तूप टाकून कालवून घेणे.
       सर्व्ह करण्याच्या वेळेस सर्व बाट्या २ चमचे तुपावर दोन्ही बाजूनी अर्धा मिनिट परतणे. परतल्यावर त्याला चाकूने मध्ये आडवी व उभी चीर पाडून तुपात बुडवून गरम गरम दाल व चुर्म्याबरोबर खायला देणे.

Comments