पनीर भुर्जी / paneer bhurji




साहित्य –

१. पनीर १ पाव
२. कांदे २
३. टमाटा १
४. कोथिंबीर आवश्यकतेनुसार
५. तेल ३ चमचे
६. मीठ चवीनुसार
७. तिखट अर्धा चमचा
८. गरम मसाला पाव चमचा
९. आले लसूण पेस्ट अर्धा चमचा
१०. मोहरी पाव चमचा
११. जिरे पाव चमचा

कृती –

प्रथम पनीर कुस्करून ठेवावे. एका कढईत तेल तापवून मोहरी, जिरे तडतडू द्यावे. त्यात चिरलेला कांदा टाकून परतून घ्यावा. मग त्यात आले लसूण पेस्ट टाकून परतवून घ्यावे. आता चिरलेला टमाटा, गरम मसाला, तिखट टाकून २ मिनिटे होऊ द्यावे. मग त्यात कुस्करलेले पनीर टाकून मीठ टाकावे. व ३ मिनिटे शिजू द्यावे. भाजी कोरडी होऊ द्यावी. जास्त शिजवू नये. जास्त परतल्यास पनीर ची चव निघून जाते, व पनीर मऊसर न लागता कडक लागते. gas बंद करून कोथिंबीर पेरून सर्व्ह करावे.

Comments