काजू करी / Kaju kari




साहित्य –

१. काजू दीड वाटी
२. कांदा १
३. टमाटे ३
४. तेल ४ चमचे
५. जिरे पाव चमचा
६. धणेपूड पाव चमचा
७. मिरच्या २
८. आले एक छोटा तुकडा
९. लसूण पाकळ्या ५
१०. तिखट अर्धा चमचा
११. साखर पाव चमचा
१२. मीठ चवीनुसार
१३. कसुरी मेथी १ चमचा
१४. हिंग पाव छोटा चमचा
१५. हळद पाव चमचा 

कृती –

काजू १ तास थंड पाण्यात भिजत ठेवावे. एका मिक्सरच्या भांड्यात त्यातील अर्धी वाटी काजू, आले, लसूण, मिरच्या, कांदा, टमाटे वाटून पेस्ट करून घ्यावी. एका भांड्यात तेल तापवून घ्यावे. त्यात जिरे तडतडू द्यावे. मग त्यात हिंग, कसुरी मेथी, धणेपूड, हळद, तिखट टाकून ढवळावे. मग वरील केलेली पेस्ट टाकून तेल सुटेपर्यंत परतावे. त्यात साखर, मीठ टाकावे. आवश्यकतेनुसार पाणी टाकून उकळू द्यावे. आता भिजवलेले सर्व काजू टाकून ५ मिनिटे होऊ द्यावे. gas बंद केल्यावर कोथिंबीर टाकून गरम सर्व्ह करावे.

Comments