भरली शिमला मिरची / stuffed capsicum




साहित्य-
१. शिमला मिरच्या १०
२. बेसन अर्धी वाटी
३. लिंबू १
४. तिखट चवीनुसार
५. मीठ आवश्यकतेनुसार
६. दाण्याचे कुट १ वाटी
७. आले-लसूण पेस्ट १ चमचा
८. गरम मसाला अर्धा चमचा
९. तेल ३ चमचे
१०. चीज २ क्युब्स
११. कोथिंबीर अर्धी वाटी 

कृती-
शिमला मिरच्या धून त्यातील बिया व पांढरा भाग अलगद चाकूच्या सहाय्याने वरील बाजूने काढून घ्यावा. बेसन भाजून घ्यावे. त्यात, लिंबू, तिखट, मीठ, दाण्याचे कुट, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला, कोथिंबीर टाकून एकत्र करावे. आता मिश्रण पोकळ केलेल्या शिमला मिरचीत भरावे. शिमला मिरची पूर्ण काठोकाठ भरू नये. अर्धी भरावी. आता एका कढईत तेल गरम करून एक एक शिमला मिरची आडवी ठेवावी. झाकण ठेऊन ५ मिनिटे बारीक gas वर शिजू द्यावे. मग झाकण काढून मिरच्या अलगद चिमट्याच्या सहाय्याने पलटवाव्या. आता परत ३ मिनिटे शिजू द्यावे. असे करून मिरच्या सर्व बाजूनी शिजवून घ्याव्या. gas बंद केल्यावर मिरच्यांमध्ये वरून चीज किसून भरावे. व गरम सर्व्ह करावे.     

Comments