चॉकलेट केक / chocolate cake




साहित्य-
१. मैदा २ वाट्या
२. रवा अर्धी वाटी
३. लोणी दीड पाव
४. साखरेची पूड दीड वाटी
५. व्हानिला इसेन्स छोटा पाव चमचा
६. सोडा अर्धा चमचा
७. बेकिंग पावडर पाव चमचा
८. चॉकलेट सॉस ५ चमचे
९. चॉकलेट राईस सजवण्यासाठी पाव वाटी
१०. कलर्ड बॉल्स १ चमचा सजवण्यासाठी
११. कोको पावडर ३ चमचे
१२. दुध आवश्यकतेनुसार
१३. चॉकलेट २ क्युब्स  

कृती-
प्रथम मैदा, रवा, अर्धा पाव लोणी, १ वाटी साखरेची पूड, कोको पावडर, व्हानिला इसेन्स चांगले एकत्र करावे. आता दुध टाकून मिश्रण थोडे पातळसर करावे. व बिटरच्या सहाय्याने चांगले एकजीव करून घ्यावे. एका अल्युमिनियमच्या पातेल्याला सगळीकडे लोणी लावून त्यावर मैदा टाकावा. तो मैदा हात न लावता झटकून झटकून सगळीकडे पसरवून घ्यावा. व जास्तीचा काढून घ्यावा. आता एक तवा मंद gas वर तापत ठेवावा. मिश्रणात सगळ्यात शेवटी बेकिंग पावडर व सोडा टाकून एकत्र करून लगेच अल्युमिनियमच्या भांड्यात ओतून ते भांडे तव्यावर झाकून ठेवावे. आता ४० मिनिटे होऊ द्यावे. वास आल्यावर ५ मिनिटे होऊ द्यावे. व gas बंद करावा. व केक थंड झाल्यावर अलगद एका ताटलीत पालथा करावा. व पूर्णपणे थंड होऊ द्यावा. व मोठ्या चाकूने त्याला मधून आडवे कापून दोन भाग करावे. एका वाटीत अर्धी वाटी पाणी घ्यावे. त्यात २ चमचे साखरेची पूड, चॉकलेट सॉस टाकून एकत्र करावे. आता हे पाणी केकच्या दोन्ही भागांवर चमच्याने सगळीकडे पसरवून टाकावे. आता एका खोलगट पातेल्यात उरलेले लोणी, साखर घेऊन ते बिटरच्या सहाय्याने हलके करावे. आता हे क्रीम केक च्या दोन्ही भागांना वरून लावावे. व परत केक एकावर एक ठेऊन द्यावा. आता केकच्या साईडने सुद्धा क्रीम लावून घ्यावी. व चांगली चाकूने व्यवस्थित एकसारखी पसरवून घ्यावी. आता पायपिंग bag मध्ये भरून त्यावर काठाने डीझाईन काढावे. व चॉकलेट राईस हातात घेऊन तो केकच्या साईडला सगळीकडे लावून घ्यावा. वरून कलर्ड बॉल्सनी सजवावे. व चॉकलेटला किसून सजवावे.    

Comments