छोले भटुरे / chole bhature




साहित्य-
१. छोले २ वाट्या
२. कांदे ४
३. टमाटे २
४. दही २ वाट्या
५. कणिक २ वाट्या
६. मैदा २ वाट्या
७. मीठ चवीनुसार
८. छोले मसाला १ चमचा
९. तिखट चवीनुसार
१०. सुके खोबरे २ इंच
११. आले एक छोटा तुकडा
१२. लसूण पाकळ्या ६
१३. तेल आवश्यकतेनुसार
१४. कोथिंबीर अर्धी वाटी
१५. मोहरी पाव चमचा
१६. जिरे पाव चमचा
१७. हळद पाव चमचा 

कृती-
रात्री छोले भरपूर पाण्यात भिजत घालावे. व सकाळी काढावे. २ कांदे चिरून घ्यावे. तव्यावर एक चमचा तेल टाकून चांगले ब्राऊन भाजून घ्यावे. त्याचप्रमाणे खोबरे चिरून भाजून घ्यावे. आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले कांदे, खोबरे, आले, लसूण टाकून बारीक पेस्ट करून घ्यावी. एका परातीत कणिक, मैदा घेऊन त्यात मीठ टाकावे. व दह्याने भिजवावे. आवश्यकता वाटल्यास थोडे पाणी टाकावे. आता हा कणकेचा गोळा कापडाने झाकून ठेवावा. एका छोट्या कुकर मध्ये ६ चमचे तेल घेऊन गरम करावे. मोहरी व जिरे तडतडू द्यावे. मग उरलेले २ कांदे उभे चिरून टाकावे. परतवून घ्यावे. मग तयार केलेली कांद्याची पेस्ट टाकावी. हळद, तिखट, छोले मसाला टाकावा. टमाटे टाकावे. आता चांगले तेल सुटेपर्यंत परतावे. मग आवश्यकतेनुसार पाणी टाकून छोले टाकावे. व मीठ टाकून कुकरला ५-६ शिट्या येऊ द्याव्या. छोले शिजले की gas बंद करून वरून कोथिंबीर टाकावी. एका कढईत भरपूर तेल तापत ठेवावे. तयार कणकेच्या गोळ्याच्या पातळ व मोठ्या पुऱ्या लाटुन दोन्ही बाजूने खरपूस तळाव्या. छोले भटुरे गरम गरम सर्व्ह करावे       

Comments