ओनियन रिंग्स / onion rings



साहित्य-
१. मोठे कांदे २
२. मैदा ४ चमचे
३. कॉर्नफ्लोअर २ चमचे
४. मीठ चवीनुसार
५. तिखट आवश्यकतेनुसार
६. तेल तळण्यासाठी
७. ब्रेडक्रम्स १ वाटी
८. पाणी आवश्यकतेनुसार
कृती-
कांदे सोलून त्याच्या गोल गोल चकत्या कापून घ्याव्या. एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, तिखट मिक्स करून पाणी टाकून पातळसर भजी सारखे पीठ करून घ्यावे. कांद्याची एक एक चकती वेगळी करून मिश्रणात घोळवून त्याला ब्रेडक्रम्स मध्ये टाकून सर्व बाजूनी नीट ब्रेडक्रम्स लावून घ्यावे. व कडकडीत तेलात सोडून तळून घ्यावे. सॉस बरोबर खायला द्यावे. 

Comments