आलू अडई / aloo adai



साहित्य-
१. बटाटे २
२. बेसन १ वाटी
३. कांदा १
४. हिंग चिमुटभर
५. आले-मिरची पेस्ट १ चमचा
६. कोथिंबीर अर्धी वाटी
७. मीठ चवीनुसार
८. तेल आवश्यकतेनुसार
९. पाणी आवश्यकतेनुसार
१०. ओवा अर्धा चमचा 
कृती-
बटाटे उकडून सोलून व कुस्करून घ्यावे. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिंग, बेसन, ओवा, आले-मिरची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, मीठ टाकून आवश्यकतेनुसार पाणी टाकावे. डोश्याच्या पीठाइतपत पातळ करावे. एका नॉनस्टिक pan वर एक चमचा तेल सोडून पसरवून घ्यावे. त्यावर वरील मिश्रण मोठ्या गोल डावाने ओतून थोडेसे पसरवावे. व बाजूने परत तेल सोडावे. असे दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यावे. गरम गरम सॉस बरोबर खायला द्यावे.

Comments