गाठीया करी / gathiya curry



साहित्य-
१. बेसन १ वाटी
२. टमाटे २
३. कांदे
४. मोहरी पाव चमचा
५. जिरे पाव चमचा
६. हळद पाव चमचा
७. गरम मसाला अर्धा चमचा
८. धने पूड अर्धा चमचा
९. कोथिंबीर अर्धी वाटी
१०. सुक्या खोबऱ्याचा कीस पाव वाटी
११. लसूण आले पेस्ट १ चमचा
१२. ओवा अर्धा चमचा
१३. दही २ चमचे
१४. तेल ५ चमचे
१५. मीठ चवीनुसार
१६. तिखट चवीनुसार
१७. पाणी आवश्यकतेनुसार
कृती-
प्रथम बेसन एका कटोऱ्यात घेऊन त्यात थोडीशी हळद, ओवा, मीठ, तिखट, अर्धा चमचा आले लसूण पेस्ट टाकून पाण्याने घट्ट गोळा भिजवून घ्यावा. ह्याचे छोटे छोटे गोळे करून त्याला हाताने लंबुळका आकार द्यावा. आता एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवून द्यावे. उकळलेकी त्यात गाठीया सोडाव्या. ५ ते ७ मिनिटे उकळावे. मग काढून घ्याव्या. ते पाणी राहू द्यावे. एका तव्यावर एक चमचा तेल गरम करून त्यावर बारीक चिरलेला कांदा चांगला भाजावा. त्याचप्रकारे खोबऱ्याचा कीस भाजावा. आता मिक्सर मध्ये कांदा, खोबरे, लसूण आले पेस्ट, धणेपूड, गरम मसाला, दही हे सर्व बारीक वाटून घ्यावे. एका पातेल्यात तेल तापवून त्यात मोहरी, जिरे तडतडू द्यावे. मग त्यात वरील वाटण, चिरलेले टमाटे, हळद, तिखट टाकून २-३ मिनिटे परतवून घ्यावे. आता ह्यात गाठीया उकडलेले पाणी व हवे असल्यास अजून थोडेसे पाणी टाकून पाण्याला उकळी येऊ द्यावी. मग मीठ टाकून गाठीया सोडाव्या व ३-४ मिनिटे शिजू द्यावे. भाजी शिजल्यावर gas बंद करून कोथिंबीर टाकावी व सर्व्ह करावे.    
टीप-
गठिया उकडल्यानंतर तळून घेऊन भाजीत टाकल्या तरी चालतात. 

Comments