अंडा पफ / egg puff



साहित्य-
१. मैदा ३ वाट्या
२. यीस्ट २ चमचे
३. मीठ चवीनुसार
४. साखर २ चिमुट
५. तेल ३ चमचे
६. कणिक २ चिमुट
७. कांदे ४
८. टमाटे २
९. आले लसूण पेस्ट १ चमचा
१०. उकडलेली अंडी ४
११. कोथिंबीर अर्धी वाटी
१२. तिखट चवीनुसार
१३. गरम मसाला अर्धा चमचा
१४. पाव भाजी मसाला अर्धा चमचा
१५. काळा मसाला पाव चमचा
१६. बटर ३ चमचे
१७. पाणी आवश्यकतेनुसार
कृती-
एका भांड्यात अर्धा कप पाणी अगदी थोडे कोंबट करून त्यात साखर विरघळून घ्यावी. त्यात यीस्ट टाकून एकजीव करावे. आता कणिक टाकून ढवळून १५-२० मिनिटांकरिता झाकून ठेवावे. एका भांड्यात मैदा घेऊन त्यात मीठ व यीस्ट चे मिश्रण टाकून गोळा घट्ट भिजवून घ्यावा. आवश्यकता वाटल्यास आणखी थोडे पाणी घालावे. हा गोळा ओल्या फडक्याने २ तास झाकून ठेवावा. एका कढईत तेल तापवून त्यात उभे चिरलेले कांदे परतवून घ्यावे. मग त्यात आले लसूण पेस्ट टाकून १ मिनिटाने चिरलेले टमाटे टाकावे. आता २ मिनिटे ढवळत राहावे. आता सर्व मसाले, तिखट व मीठ टाकून एकजीव करून gas बंद करून त्यात चिरलेली कोथिंबीर मिक्स करावी. आता उकडलेल्या अंड्यांची साले काढून एका अंड्याचे दोन याप्रमाणे भाग करून ठेवावे. मैद्याचा गोळा फुगून दुप्पट झाला की त्याचे छोटे छोटे गोळे घेऊन पुर्या लाटाव्या. त्यातील ४-५ पुर्यांच्या चाकूने बारीक पट्या कापून ठेवाव्या. आता एक पुरी घ्यावी त्यावर १ चमचा कांद्याचे मिश्रण मधोमध पसरवावे. त्यावर उकडलेले अर्धे अंडे पालथे ठेवावे. अंड्याच्या उलट्या बाजूस परत कांद्याचे मिश्रण थोडेसे पसरवून घ्यावे. आता ह्यावर अलगद दुसरी पुरी ठेवावी. कडांनी दाबून त्यावर एक गोलाकार वाटी उलटी ठेवून दाबून गोल आकार द्यावा. व वाटीच्या बाहेर आलेले मैद्याचे मिश्रण काढून घ्यावे. आता ह्या गोळ्याला पट्ट्या लावण्यासाठी पट्ट्यांना एका बाजूने पाणी लावून घ्यावे. पाणी लावलेली बाजू गोळ्यावर चीट्कवावी. याप्रमाणे एका गोळ्याला ४ पट्ट्या चिटकवून घ्याव्या. एका मायक्रोवेव्ह प्रूफ प्लेटला थोडेसे बटर लावून त्यावर हे गोळे ठेवावे. व पिझ्झा करतो त्याप्रमाणे १५-२० मिनिटे होऊ द्यावे. वरून थोडासा खरपूस रंग यायला लागल्यास ओव्हन बंद करावा. गरम गरम अंडा पफ वर बटर सोडून सॉस बरोबर खायला द्यावे.  

Comments