कांद्याची खेकडा भजी / kanda khekda bhaji


साहित्य-
१. कांदे ४
२. बेसन आवश्यकतेनुसार
३. मीठ चवीनुसार
४. जिरे पूड १ चमचा
५. तिखट चवीनुसार
६. ओवा १ चमचा
७. तेल तळण्यासाठी

कृती-
कांदे लांब पातळ चिरून घ्यावे. त्याला मीठ लावून १५ मिनिटे झाकून ठेवावे. आता कांदा थोडा चोळून मोकळा करावा. मग त्यात जिरे पूड, तिखट, ओवा व थोडेसे बेसन टाकावे. पाणी टाकू नये. मग तेल तापवून त्यात ४ चमचे गरम तेलाचे मोहन टाकावे. हाताने थोडे थोडे मिश्रण घेऊन तेलात सोडावे. व तळून घ्यावे. ही भजी गरम गरम सॉस बरोबर खावी.

Comments