अळू वड्या / alu vadi


साहित्य-
१. अळूची पाने ७-८
२. बेसन २ वाट्या
३. लसूण पाकळ्या ७-८
४. आले एक छोटा तुकडा
५. मीठ चवीनुसार
६. तिखट २ चमचे
७. हळद पाव चमचा
८. तेल आवश्यकतेनुसार
९. पाणी आवश्यकतेनुसार
१०. जिरे अर्धा चमचा

कृती-
प्रथम अळूची पाने धून व पुसून घ्यावी. लसूण, आले व जिरे ठेचून घ्यावे. एका भांड्यात बेसन, ठेचलेले लसूण-आले, हळद, मीठ, तिखट, एकत्र करून पाण्याने पातळसर भिजवावे. हे मिश्रण पानांना दोन्ही बाजूने हाताने पसरवून सगळीकडे निट लावावे. पानाला मिश्रण लावल्यावर चारही बाजूनी फोल्ड करून त्याची घडी करावी. सगळी पाने तयार झाल्यावर एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवावे. पातेल्यावर फिट्ट बसेल अश्या एका अल्युमिनियमच्या चाळणीला आतून तेल लावून त्या चाळणीवर सर्व पाने ठेवावीत. पातेल्यातील पाण्याला उकळी आल्यावर चाळणी त्या पातेल्यावर ठेवून झाकण ठेवावे. व मध्यम आचेवर १५ मिनिटे होऊ द्यावे. आता वड्या पालथ्या करून परत झाकण ठेऊन १५ मिनिटे होऊ द्यावे. वड्या शिजल्यावर खाताना त्यावर तेल सोडून खावे.
 
टीप-
ज्या पानांच्या शिरा पांढऱ्या असतील अशीच पाने घ्यावीत. नाहीतर वड्या खाल्यावर तोंड खाजवायची शक्यता असते.

Comments