कोथिंबीर वडी / dhaniya vadi


साहित्य-
१. कोथिंबीर १ पाव
२. किसलेले खोबरे १ वाटी
३. लसूण पाकळ्या ५-६ पाकळ्या
४. आले एक छोटा तुकडा
५. मिरच्या ४
६. हळद पाव चमचा
७. खसखस २ चमचे
८. बेसन २ वाट्या
९. तेल आवश्यकतेनुसार
१०. मीठ चवीनुसार
११. तिखट आवश्यकतेनुसार
१२. पाणी आवश्यकतेनुसार
१३. मोहरी पाव चमचा
१४. जिरे पाव चमचा

कृती-
प्रथम कोथिंबीर धून कोरडी करून घ्यावी. बारीक चिरून घ्यावी. आले, लसूण, मिरच्या वाटून घ्याव्या. एका कढईत ३ चमचे तेल घेऊन त्यात मोहरी व जिरे तडतडू द्यावे. लसूण-आल्याची पेस्ट, तिखट, हळद टाकावी. मग कोथिंबीर टाकून होऊ द्यावे. कोथिंबीर मधील पाणी पूर्णपणे आटू द्यावे. कोरडी झाल्यावर त्यात खसखस, मीठ व खोबरे टाकावे. ढवळून gas बंद करावा. मिश्रण थंड होण्यास ठेवावे. एका भांड्यात बेसन घेऊन त्यात मीठ टाकून एकत्र करावे. एका कढईत ३ चमचे तेल कडकडीत तापवून ते मोहन बेसनात घालून बेसन पाण्याने घट्ट भिजवून घ्यावे. ह्या बेसनाच्या पुऱ्या लाटून त्या पुरीत कोथिंबीरचे सारण भरून पुरी चारही बाजूनी दुमडून बंद करून घ्यावी. अश्या प्रकारे सर्व वड्या हव्या त्या आकारात तयार करून घ्याव्या व चांगल्या तापलेल्या तेलात मध्यम आचेवर खरपूस तळून घ्याव्या. गरम गरम सर्व्ह कराव्या.

टीप-
पुरीत मिश्रण भरल्यावर ती बंद करताना नीट बंद करावे. त्याला छिद्र राहता कामा नये. अन्यथा वड्या तळल्यावर त्यात तेल जाऊन वड्या तेलकट लागण्याची शक्यता असते.

Comments