जिलबी विथ रबडी / jalebi with rabri


साहित्य-
जिलबी-
१. मैदा १ पाव
२. दही ३ चमचे
३. पिवळा रंग पाव चमचा
४. साखर ३०० ग्रॅम
५. तांदुळाचे पीठ १ चमचा
६. तेल तळण्याकरिता
७. पाणी आवश्यकतेनुसार
रबडी-
१. दुध १ लिटर
२.  साखर १ वाटी
३. जायफळ-वेलची पूड अर्धा चमचा
४. बदाम सजवण्यासाठी
५. मनुके सजवण्यासाठी

कृती-
जिलबी-
आदल्या रात्री मैदा, दही, रंग, तांदुळाचे पीठ एकत्र करून कोमट पाण्याने भिजवावे. इडलीच्या पिठापेक्षा घट्ट ठेवावे. जास्त पातळ करू नये व गुठळ्या मोडून घ्याव्या. दुसऱ्या दिवशी १ कप पाण्यात साखर घालून gas वर उकळत ठेवावी. एक तार आल्यावर gas बंद करावा. एक जाड कापड घेऊन ते चौकोनी कापून त्याला मधोमध बारीक छिद्र पडावे.
एका परातीत तेल घेऊन तापवण्यास ठेवावे. (परातीच्या ऐवजी थाळा घेतला तरी चालेल) तेल चांगले तापल्यावर कपड्यात जिलबीचे मिश्रण ओतून तेलात गोलाकार जिलब्या सोडाव्या. दोन्ही बाजूनी तळून घ्याव्या. गरम गरम जिलब्या पाकात सोडाव्या. दुसरा घाणा होईपर्यंत पाकात ठेवाव्या. नंतर काढून घ्याव्या. 
रबडी-
एका भांड्यात दुध, घेऊन ते अटवण्यास ठेवावे. अर्धा तास झाल्यावर साखर, जायफळ-वेलची पूड टाकून अजून आटवावे. दुध घट्ट होत आले की gas बंद करावा. रबडी फ्रिझमध्ये थंड होऊ द्यावी.
सर्व्ह करताना एका प्लेट मध्ये जिलब्या ठेऊन त्यावर रबडी ओतावी व वरून मनुके व बदामाचे काप टाकावे.

Comments