हेल्दी बीट कटलेट ( healthy beetroot cutlets )




साहित्य - 

१. बीट २ 
२. जाड पोहे अर्धी वाटी
३. ओटस अर्धी वाटी
४. मीठ चवीप्रमाणे
५. तिखट चवीनुसार
६. चाट मसाला अर्धा चमचा
७. धने पूड अर्धा चमचा
८. कोथिंबीर अर्धी वाटी 
९. कांदे २
१०. बटाटे २ मोठे
११. गरम मसाला अर्धा चमचा
१२. रवा वरून लावण्याकरिता

कृती - 

बटाटे आणि बीट कूकर मधे ३-४ शिटी करून शिजवून घ्यावे. आता बीट आणि बटाटा चे साल काढून बारीक किसणीने किसून घ्यावे. त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, धने पूड, मीठ, तिखट, गरम मसाला, चाट मसाला, ओटस, जाड पोहे टाकून छान एकत्र करून घ्यावे. आता एका प्लेट मध्ये रवा घ्यावा. मिश्रणाचे हवे त्या आकारात कटलेट बनवावे. एका नॉनस्टिक पॅनमध्ये एक चमचा तेल तापवून त्यावर कटलेट ठेवावे. मंद आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे. गरम गरम सॉस बरोबर सर्व्ह करावे. 

Comments