मलाई केक ( malai cake )



साहित्य - 

१. फुल क्रीम दूध १ लिटर
२. पिठीसाखर सव्वा वाटी 
३. बदाम इसेन्स ४ थेंब 
४. मैदा दीड वाटी 
५. बेकिंग पावडर एक चमचा
६. बेकिंग सोडा एक चमचा
७. तेल पाव वाटी 
८. दूध आवश्यकतेनुसार
९. केशर ७-८ काड्या
१०. बदाम, पिस्ता सजावटी साठी
११. दही पाव वाटी

कृती - 

एका भांड्यात दूध घेऊन ते आटवण्यास ठेवावे. अर्धे झाले की त्यात २-३ केशर च्या काड्या, अर्धी वाटी साखर टाकून १० मिनिटांनी गॅस बंद करून त्यात २ थेंब इसेन्स टाकून थंड होऊ द्यावे. आता केक साठी एका भांड्यात तेल घेऊन दही, २ चमचे इसेन्स, पाऊण वाटी साखर टाकून नीट एकत्र करावे. आता एका चाळणीत मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा घेऊन एकत्र चाळून दह्याच्या मिश्रणात टाकावे. नीट एकत्र करावे. आवश्यकतेनुसार दूध टाकावे. एका हिट प्रुफ काचेच्या भांड्याला तूप लावून त्यावर मैदा पसरवून उरलेला झटकून घ्यावा. आता केक चे मिश्रण भांड्यात ओतावे. एका कढईत किंवा मोठ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवावे. त्यात स्टँड ठेवावे. स्टँड च्या वरती पाणी येऊ देऊ नये. पाणी गरम झाले की केक चे भांडे स्टँड वर ठेऊन मोठ्या भांड्यावर झाकण ठेऊन नीट बंद करावे. गॅस मिडयम आचेवर करून अर्धा तास केक वाफवून घ्यावा. केक शिजल्यावर थंड होऊ द्यावा. आता भांड्यातून न काढता त्यावर आटवलेले दूध ओतावे. हे भांडे फ्रिज मधे थंड होण्यासाठी ठेवावे. नंतर केक कापून सर्व्ह करताना आवडत असल्यास परत दूध टाकावे. वरतून बदामाचे व पिस्त्याचे पातळ काप सजवावे. 

Comments