आंबा बर्फी ( mango barfi )




साहित्य - 

१. हापूस आंबे ३ 
२. साखर एक वाटी 
३. वेलचीपूड अर्धा चमचा
४. तूप ४-५ चमचे 
५. दूध पावडर अडीच वाटी 

कृती - 

आंब्याची साल काढून गर मिक्सर मधे फिरवून घ्यावा. पाणी टाकू नये. एका नॉनस्टिक पॅनमध्ये २ चमचे तूप गरम करून त्यात मिल्क पावडर टाकून मंद गॅसवर ५ मिनिटे परतावे. रंग बदलू देऊ नये. आता काढून घ्यावे. त्याच पॅनमध्ये परत २ चमचे तूप गरम करून आंब्याचा गर टाकून ५-७ मिनिटे मिडीयम आचेवर परतत राहावे. थोडा घट्ट झाला की गॅस बंद करावा. एका भांड्यात साखर घेऊन त्यात साखर भिजेल एवढेच पाणी टाकून गरम करायला ठेवावे. साखर विरघळली की २ मिनिटे शिजू द्यावे. घट्ट पाक होऊ देऊ नये. गॅस मंद करून लगेच त्यात मिल्क पावडर टाकून एकत्र करावे. आता आंब्याचा गर, वेलचीपूड टाकून एकत्र करावे. व ३-४ मिनिटे शिजू द्यावे. मिश्रणाचा पातळपणा कमी होऊन  घट्ट होऊ द्यावे. गॅस बंद करावा. एका चौकोनी आकाराच्या भांड्याला सगळीकडे आतून तूप लावून घ्यावे. तयार झालेले मिश्रण त्यात ओतून पूर्णपणे थंड झाल्यावर वड्या कापून घ्याव्या. 

Comments