चिकन मोमोज ( chicken momos )



साहित्य - 

१. चिकन खिमा एक पाव 
२. मैदा दीड वाटी
३. मीठ चवीनुसार
४. कांद्याची पात अर्धी वाटी
५. कांदा एक
६. मिरच्या २ 
७. मिरपूड एक चमचा
८. सोया सॉस एक चमचा
९. तेल २ चमचे 
१०. कोथिंबीर पाव वाटी

कृती - 
 
मैद्यात चवीनुसार मीठ टाकून पाण्याने घट्ट भिजवून गोळा झाकून अर्धा तास मुरण्यास ठेवावा. खिमा एका भांड्यात घेऊन त्यात कांद्याची पात, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरच्या, सोया सॉस, तेल, मीठ, मिरपूड टाकून नीट एकत्र करावे. आता मैद्याचे अगदी छोटे छोटे गोळे करून पातळ पारी लाटून घ्यावी. त्यात चिकनचे एक चमचा मिश्रण मधोमध ठेऊन पारीला एका बाजूने प्लेन व एका बाजूने छोटे छोटे मोड देऊन मोमोजचा आकार द्यावा. दोन्ही बाजू दाबून जोडून घ्याव्या. असे सर्व मोमोज बनवून घ्यावे. एका मोठ्या भांड्यात पाणी तापवुन त्यावर चाळणी ठेऊन त्याला तेल लावावे. त्यावर सर्व मोमोज ठेऊन झाकण ठेवावे. २० ते २५ मिनिटे मध्यम आचेवर शिजू द्यावे. गरम गरम शेजवान चटणी बरोबर सर्व्ह करावे. 

Comments