गव्हाच्या पिठाची चकली ( wheat flour chakli)



साहित्य - 

१. गव्हाचे पीठ २ वाट्या 
२. तांदुळाचे पीठ अर्धी वाटी 
३. तेल तळण्यासाठी
४. तीळ २ चमचे 
५. ओवा अर्धा चमचा 
६. धणेपूड दीड चमचा 
७. तिखट चवीनुसार
८. मीठ चवीनुसार
 
कृती - 
एका भांड्यात गव्हाचे पीठ व तांदुळाचे पीठ एकत्र कालवून घ्यावे. एका पातळ कपड्यात ठेऊन दोऱ्याने बांधून एका भांड्यात ठेवावे. आता हे भांडे स्टीमर मध्ये २० मिनिटे ठेऊन वाफवून घ्यावे. (कुकर मध्ये वाफवले तरी चालते. त्याकरता कुकरच्या भांड्यात हे बांधलेले कापड ठेवावे. कुकर मध्ये पाणी ठेऊन त्यात हे भांडे ठेवून रिंग न लावता झाकण लावून २० मिनिटे वाफवून घ्यावे.) २० मिनिटांनंतर पुडी सोडून थंड झाल्यावर पिठाच्या सर्व गुठळ्या मोडून घ्याव्या. आता त्यात तीळ, ओवा, तिखट, मीठ, धणेपूड टाकून एकत्र करावे. व थंड पाण्याने घट्ट गोळा मळून घ्यावा. आता चकलीच्या साच्याने चकल्या पाडून घ्याव्या. तेल चांगले तापवून मग गॅस मिडीयम करून चकल्या खरपूस रंगावर तळून घ्याव्या. 

Comments