घारगे (gharge)



साहित्य - 

१. लाल भोपळा किसलेला २ वाटी
२. कणिक अडीच ते तीन वाटी
३. मीठ अर्धा चमचा
४. किसलेला गूळ दिड वाटी
५. तांदूळ पीठ २ चमचे 
६. जायफळाची पूड अर्धा चमचा
७. तेल तळण्यासाठी
८. साजूक तूप १ चमचा

कृती - 
भोपळ्याचा किस करण्यासाठी त्याची आधी साले काढून घ्यावी. मग किसून घ्यावा. आता हा किस एका भांड्यात गरम करण्यास गॅसवर ठेवावा. तूप टाकून मिडीयम आचेवर १ मिनिट परतून मग त्यात गूळ टाकावा. आता भोपळा ७-८ मिनिटे शिजू द्यावा. मधून मधून ढवळत राहावे. गुळाचे पाणी होऊन मग मिश्रण घट्ट होत आले की गॅस बंद करावा. त्यात जायफळाची पूड टाकून एकत्र करून थंड होण्यास ठेवून द्यावे. आता एका भांड्यात कणिक, तांदुळाचे पीठ, मीठ एकत्र करून त्यात थंड झालेले मिश्रण टाकावे. व चांगला घट्ट गोळा करून घ्यावा. कणकेत पाणी टाकू नये. मिश्रण पातळ होत असले तर अजून थोडी कणिक टाकावी. आता त्याला वरून तेलाचा हात लावून अर्धा तास झाकून ठेवावे. मग अर्ध्या तासाने त्याचे छोटे छोटे गोळे करून थोडी कणिक लावून पुऱ्या लाटून घ्याव्या. व हे घारगे तेलात मिडीयम आचेवर तळून गरम सर्व्ह करावे. 

Comments