रवा केक / semolina cake




साहित्य -

1. रवा २ वाटी
२. मैदा अर्धी वाटी
३. खाण्याचा सोडा अर्धा चमचा
४. बेकिंग पावडर १ चमचा
५. पिठीसाखर १ वाटी
६. व्हेनीला इसेन्स एक छोटा चमचा
७. काजू ७-८
८. टूटी फ्रुटी अर्धी वाटी
९. तेल अर्धी वाटी
१०. दही १ वाटी
११. दुध आवश्यकतेनुसार
१२. साजूक तूप २ चमचे 

कृती –

एका भांड्यात दही फेटून घेणे. त्यात तेल व पिठीसाखर टाकून परत २ मिनिटे फेटणे. आता त्यात रवा, मैदा टाकून एक वाटी दुध टाकून मिश्रण थोडे फेटून अर्धा तास झाकून ठेवणे. त्यात इसेन्स, पाव वाटी टूटी फ्रुटी, काजूचे तुकडे करून टाकणे. आवश्यकतेनुसार दुध टाकून मिश्रण ओतण्याइतपत पातळ करून घेणे. एका अल्युमिनियमच्या भांड्याला आतून तूप लावून घेणे. एक लोखंडी तवा एकदम बारीक आचेवर तापण्यास ठेवावा. आता मिश्रणात सोडा व बेकिंग पावडर टाकून निट एकत्र करून घेणे व लगेच तूप लावलेल्या भांड्यात ओतून त्यावर टूटी फ्रुटी पसरवावी. हे भांडे तव्यावर ठेऊन झाकण ठेवावे. अर्धा ते पाऊण तास केक शिजू द्यावा. अर्ध्या तासाने एकदा केक मध्ये टूथपिक टाकून पहावी. केक टूथपिकला चिकटला असेल तर अजून थोडा वेळ शिजू द्यावा. नसेल चिकटला तर थंड होण्यास बाजूला ठेवावा. १५ मिनिटांनी केक भांड्यातून उलटा करून काढून घ्यावा.

Comments