कैरीची डाळ / mango dal




साहित्य -   

१. कैरी १
२. हरबरा डाळ १ वाटी
३. मिरच्या ६
४. हिंग पाव चमचा
५. मोहरी पाव चमचा
६. जिरे पाव चमचा
७. तेल ४ चमचे
८. हळद पाव चमचा
९. साखर अर्धा चमचा
१०. मीठ चवीनुसार
११. कढीपत्ता ७-८ पाने

कृती –

हरबरा डाळ ४ तास भिजत ठेवणे. मिक्सर मध्ये जाडसर वाटून घेऊन एका भांड्यात काढून घेणे. त्यात कैरी किसून टाकणे. मिरची वाटून घेणे. एका कढल्यात तेल तापवून त्यात मोहरी, जिरे तडतडू देणे. त्यात कढीपत्ता, हळद, हिंग, वाटलेली मिरची परतून ही फोडणी डाळीच्या मिश्रणात टाकणे. त्यात साखर, मीठ टाकून एकत्र करणे. कैरीची डाळ जेवतांना चटणी सारखी सर्व्ह करावी. किंवा ही डाळ नुसतीही छान लागते.

Comments