रवा पकोडा / suji pakora




साहित्य -

१. रवा २ वाट्या
२. मैदा पाव वाटी
३. कांदा १
४. मिरच्या ४
५. कढीपत्ता ५ पाने
६. सोडा पाव चमचा
७. मीठ चवीनुसार
८. तेल तळण्यासाठी
९. कोथिंबीर अर्धी वाटी
१०. दही पाऊण वाटी
११. आल्याची पेस्ट अर्धा चमचा 

कृती –

एका भांड्यात रवा, मैदा घेऊन त्यात दही, आल्याची पेस्ट, चिरलेला कांदा, मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, मीठ टाकून एकत्र करावे. आवश्यकता वाटल्यास थोडे पाणी टाकावे. अर्धा तास मुरण्यास ठेवावे. मुरल्यावर मिश्रण थोडे घट्ट होईल. पकोडे हाताने तेलात सोडता येतील एवढे पातळ मिश्रण बनवावे. आता सोडा टाकून मिक्स करून घेणे. गरम तेलात खरपूस पकोडे तळून घेणे.

Comments