एग पॉकेट / egg pocket




साहित्य –

१. अंडी ४
२. कांदा १
३. कोथिंबीर पाव वाटी
४. पुदिना पाव वाटी
५. हिरव्या मिरच्या २
६. तिखट अर्धा चमचा
७. मीठ चवीनुसार
८. तेल आवश्यकतेनुसार
९. हळद पाव चमचा
१०. कणिक ३ वाट्या
११. चीज क्युब्स २-३  

कृती –

कणकेत पाव चमचा मीठ घालून पाण्याने मऊसर गोळा करून भिजवून घेणे. एका भांड्यात अंडी फोडून त्यात बारीक चिरलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर, मिरच्या, मीठ, हळद, तिखट टाकून एकत्र करून घेणे. आता पोळीकरता घेतो तेवढा कणकेचा गोळा लाटुन घेणे. त्याला वरील बाजूने एक चमचा तेल पसरवून लावणे. त्यावर थोडे पीठ सगळीकडे शिंपडणे. त्याची अर्धी घडी करून परत तेल व पीठ शिंपडणे. अश्याप्रकारे एकूण चार वेळा घडी करावी. शेवटी त्याची चौकोनी घडी करावी. आता ह्याची चौकोनी पोळी लाटणे. तवा तापवून मग मंद gas करून अर्धा चमचा तेल पसरवून लावून त्यावर पोळी ठेवावी. त्या पोळीच्या मधोमध ४-५ चमचे अंड्याचे मिश्रण टाकावे. अर्ध्या मिनिटाने ह्या चौकोनी पोळीची २ टोके अंड्याच्या मिश्रणावर ठेवावी. परत १ मिनिटाने बाजूची दोन टोके मिश्रणावर ठेवून पॉकेट बनवावे. खालच्या बाजूने चांगले खरपूस भाजल्यावर पलटवावे. परत अर्धा चमचा तेल सोडून चांगले भाजावे. सर्व्ह करताना अर्धे चिरून वरून किसलेले चीज सजवावे.

Comments