कैरीची चटणी / mango chatni




साहित्य –

१. कैऱ्या २
२. कोथिंबीर अर्धी वाटी
३. आले एक छोटा तुकडा
४. लसूण पाकळ्या ५
५. मिरच्या ३
६. मीठ चवीनुसार
७. साखर अर्धा चमचा
८. जिरे अर्धा चमचा 

कृती –

कैरी धुवून साले काढून तुकडे करून घ्यावे. आता कैरीसकट सर्व साहित्य मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घ्यावे.
टीप –
चटणी आंबट हवी असल्यास गोल कैरी वापरावी. व कमी आंबट हवी असल्यास लांबट आकाराची (तोतापुरी) कैरी वापरावी.

Comments