अंड्याचा खिमा / egg kheema




साहित्य –

१. अंडी ४
२. कांदा १
३. टमाटे २ छोटे
४. कोथिंबीर १ वाटी
५. मिरच्या ४
५. आले लसूण पेस्ट १ चमचा
६. तिखट आवश्यकतेनुसार
७. हळद पाव चमचा
८. मीठ चवीनुसार
९. पाणी आवश्यकतेनुसार
१०. तेल ४ चमचे
११. मोठी वेलची १
१२. विलायची ३
१३. मिरे ४
१४. लवंग २
१५. तमालपत्र १
१६. कढीपत्ता ५-६ पाने
१७. धने पूड अर्धा चमचा
१८. जिरे पूड अर्धा चमचा
१९. हिरवे वाटाणे अर्धी वाटी 

कृती –

अंडी उकडून व किसून घ्यावी. कांदा बारीक चिरून तव्यावर अर्धा चमचा तेल टाकून काळसर भाजून काढून घ्यावा. एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेला कांदा, टमाटे, अर्धी वाटी कोथिंबीर, आले लसूण पेस्ट वाटून घ्यावे. एका भांड्यात तेल गरम करावे. मोठी वेलची, तमालपत्र, विलायची, लवंग, मिरे, कढीपत्ता, मिरच्या चिरून टाकाव्या. आता वाटलेला मसाला टाकून १० मिनिटे चांगले परतावे. आता त्यात जिरे पूड, धने पूड, तिखट, हळद, वाटाणे टाकून झाकण ठेऊन ५ मिनिटे चांगले तेल सुटेपर्यंत परतावे. आता किसलेली अंडी टाकून आवश्यकतेनुसार पाणी टाकावे. मीठ टाकून २ मिनिटे शिजू द्यावे. वरून कोथिंबीर पेरावी.

Comments