तंदुरी कोळंबी / tandoori prawns
साहित्य –
१. कोळंबी मध्यम आकाराची १५
२. घट्ट दही पाव वाटी
३. गरम मसाला अर्धा चमचा
४. तिखट अर्धा चमचा
५. धणेपूड १ चमचा
६. कसुरी मेथी अर्धा चमचा
७. मीठ चवीनुसार
८. अर्ध्या लिंबाचा रस
९. आले-लसूण पेस्ट एक चमचा
१०. तेल एक चमचा
कृती –
प्रथम कोळंबी धुवून स्वच्छ
करून घ्यावी. वरील सर्व साहित्य एकत्र करून कोलंबीला लावून २ तास फ्रीज मध्ये ठेऊन
द्यावे. मग तंदूर स्टिक्स मध्ये खोचून ग्रीलच्या तव्यावर किंवा तंदूर मध्ये १०
मिनिटे भाजून घ्यावे.
टीप-
१. तव्यावर करत असल्यास थोडे
तेल सोडावे.
२. लाकडी तंदूर स्टिक्स
वापरण्याआधी ५ मिनिटे पाण्यात बुडवून ठेवाव्या.
Comments
Post a Comment