शाही पनीर कोफ्ता करी / shahi paneer kofta curry




साहित्य-

१. पनीर १ पाव
२. टमाटे २
३. कांदे २
४. आले-लसूण पेस्ट १ चमचा
५. गरम मसाला १ चमचा
६. हिरव्या मिरच्या ४
७. तिखट १ चमचा
८. मीठ चवीनुसार
९. तेल आवश्यकतेनुसार
१०. खवा पाऊण वाटी
११. हळद पाव चमचा
१२. बदाम-पिस्ता बारीक तुकडे २ चमचे
१३. जायफळ-वेलची पूड १ चमचा
१४. काळी मिरीपूड अर्धा चमचा
१५. काजू पेस्ट अर्धी वाटी
१६. दही पाव वाटी
१७. कसुरी मेथी १ चमचा
१८. फ्रेश क्रीम २ चमचे
१९. कोथिंबीर पाव वाटी
२०. मैदा पाव वाटी 

कृती-

पनीर किसून घ्यावे. त्यात मैदा, मिरपूड, अर्धा चमचा जायफळ-वेलची पूड, मीठ टाकून चांगले मळून घ्यावे. त्याचे लिंबाएवढे गोळे करावे. आता अर्धी वाटी खवा घेऊन त्यात बदाम पिस्त्याचे बारीक केलेले तुकडे टाकावे. व एकत्र करून याचे पनीर च्या गोळ्यांपेक्षा अर्धे छोटे गोळे करावे. आता पनीरच्या गोळ्यांमध्ये खव्याचे गोळे भरून व्यवस्थित बंद करून तेलात तळून घ्यावे. एका मिक्सरच्या भांड्यात टमाटे, कांदे, मिरच्या, हळद, तिखट, कसुरी मेथी, आले-लसूण पेस्ट, उरलेली जायफळ-वेलची पूड, गरम मसाला वाटून बारीक पेस्ट करून वेगळी ठेवणे. परत मिक्सर मध्ये दही व उरलेला खवा फिरवून घेणे. आता एका भांड्यात ४ चमचे तेल गरम करून त्यात कांद्याची वाटलेली पेस्ट टाकून चांगले तेल सुटेपर्यंत परतावे. मग दही-खव्याची पेस्ट टाकून २ मिनिटे परतावे. मग काजूची पेस्ट टाकून पनीरचे गोळे त्यात सोडून मीठ, कोथिंबीर व फ्रेश क्रीम टाकून gas बंद करावा. गरम भाजी तंदुरी रोटी बरोबर सर्व्ह करावी.

Comments