बोंबील फ्राय / bombay duck fry




साहित्य –

१. बोंबील १०
२. कोथिंबीर १ वाटी
३. हिरव्या मिरच्या ५
४. हळद अर्धा चमचा
५. आले-लसूण पेस्ट १ चमचा
६. मैदा १ वाटी
७. रवा अर्धी वाटी
८. एका लिंबाचा रस
९. मीठ चवीनुसार
१०. तिखट अर्धा चमचा
११. तेल तळण्याकरिता 

कृती –

प्रथम बोंबील अर्धी चिरून त्याला मधून काप मारून धुवून घ्यावी. त्याला मीठ, पाव चमचा हळद, अर्ध्या लिंबाचा रस लावून अर्धा तास ठेऊन द्यावे. आता बोंबीलला सुटलेले सर्व पाणी काढून टाकावे. एका ताटात पसरवून थोडी कोरडी करून घ्यावी . एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, मिरच्या, हळद, आले-लसूण पेस्ट, उरलेला लिंबाचा रस, मीठ, तिखट टाकून बारीक पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट बोंबीलला दोन्ही बाजूनी चांगली लावून १५ मिनिटे ठेवावे. एका ताटलीत रवा व मैदा एकत्र करून त्यात एक एक बोंबील घोळवून गरम तेलात दोन्ही बाजूंनी गोल्डन कलर येईपर्यंत तळावी. गरम खाण्यास द्यावी.

Comments