चिकन थुक्पा सूप / chicken thukpa soup




साहित्य –

१. चिकन एक मोठा लेग पीस
२. स्पेगेटी नूडल्स २०-२५
३. कांदे २ मोठे
४. काळीमिरीपूड अर्धा चमचा
५. मिरच्या ५
६. गाजर अर्धे
७. आल्याचे मोठे काप ६-७
८. डार्क सोया सॉस ३ चमचे
9. मीठ चवीनुसार
१०. अर्ध्या लिंबाचा रस
११. कोथिंबीर पाव वाटी
१२. कांद्याची पात अर्धी वाटी
१३. ऑलिव्ह ऑईल ४ चमचे 

कृती –

चिकन धुवून घ्यावे. एक मोठ्या भांड्यात तेल गरम करून त्यात चिकन दोन्ही बाजूनी ५-५ मिनिटे भाजून घ्यावे. त्यात उभा चिरलेला कांदा, गाजराचे मोठे काप, बारीक चिरलेल्या मिरच्या, आले, टाकून ५ मिनिटे शिजवून घ्यावे. त्यात जेवढे सूप करायचे असेल तेवढे पाणी टाकावे. अंदाजे ८-१० कप टाकावे. आता त्यात सोया सॉस, लिंबाचा रस, मीठ, मिरपूड टाकून झाकण ठेऊन १५-२० मिनिटे शिजू द्यावे. चिकन हाडापासून वेगळे होत असल्यास चिकनचा पीस काढून घ्यावा. व त्याचे छोटे छोटे तुकडे करून परत सूपमध्ये टाकून द्यावे. आता नूडल्स टाकून ८ मिनिटे शिजू द्यावे. आता कांद्याची पात व कोथिंबीर टाकून गरम सर्व्ह करावे.

Comments