उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम ( fasting gulab jamun)

साहित्य - 

१. रताळी ३ 

२. मिल्क पावडर १ वाटी अंदाजे

३. साखर दीड वाटी 

४. वेलचीपूड २ छोटे चमचे 

५. सोडा पाव छोटा चमचा 

६. तेल तळण्यासाठी


कृती - 

कुकरमध्ये पाणी टाकून त्यात एक भांडे ठेवावे. त्यात रताळी ठेवून पाणी न टाकता ३ शिट्या करून शिजवून घ्यावी. शिजल्यावर थंड करून साल काढून टाकावे. व बारीक किसणीने किसून घ्यावे. आता त्यात मावेल एवढी मिल्क पावडर, १ चमचा वेलचीपूड, सोडा टाकावा व मिश्रण एकजीव करावे. मिश्रण पातळ राहता कामा नये. त्याचे छान छोटे छोटे गोळे करावे. गोळे प्लेन करावे. त्यांना चिरा पडू देऊ नये. एका भांड्यात साखर व दीड वाटी पाणी गरम करण्यास ठेवावे. उकळी आली की एक चमचा वेलचीपूड टाकावी व गॅस बंद करावा. आता एका कढईत तेल तापवून गॅस मिडीयम करावा. व थोडे गोळे अलगद तेलात सोडावे. लगेच हलवू नये. नाहीतर फुटण्याची शक्यता असते. अर्धा मिनिट तसेच ठेवावे. मग हळूहळू हलवत जावे. ब्राऊन रंग होईपर्यंत तळून काढून घ्यावे. अश्याप्रकारे सर्व गुलाबजाम तळून घ्यावे. गरम गुलाबजाम पाकात टाकावे. २ तास झाकून मूरण्यास ठेवून द्यावे. २ तासांनी सर्व्ह करावे. 

Comments