खुसखुशीत खव्याची करंजी (crispy mawa gujhiya )

साहित्य - 

१. खवा एक पाव 

२. रवा अर्धी  वाटी 

३. मैदा ४ वाट्या 

४. काजू ८-१० 

५. बदाम ८

६. मनुका ८-१० 

७. पिठीसाखर दिड वाटी 

८. वेलचीपूड अर्धा चमचा

९. जायफळाची पूड अर्धा चमचा 

१०. तूप अर्धी वाटी अंदाजे

११. तेल तळण्यासाठी 

१२. मीठ पाव चमचा 


कृती - 

मैद्यामध्ये पाव वाटी तूप व मीठ घालून मळून घ्यावे. मग पाण्याने घट्ट भिजवून घ्यावे. पीठ सैल करू नये. अर्धा तास झाकून ठेवावे. एका भांड्यात २ चमचे तूप टाकून त्यात रवा लालसर भाजून घ्यावा व काढून घ्यावा. त्याच भांड्यात खवा टाकून मध्यम आचेवर लालसर रंग येईपर्यंत भाजावा. व रवा असलेल्या भांड्यात टाकावा. सर्व मिश्रण थंड झाल्यावर त्यात काजू, बदामाचे तुकडे करून टाकावे. मनुका, वेलचीपूड, जायफळाची पूड, पिठीसाखर टाकून चांगले एकत्र करावे. आता भिजवलेल्या मैद्यातील एक पेढ्याएव्हढा गोळा घेऊन त्याची जाडसर पुरी लाटावी. अर्ध्या बाजूत मिश्रण ठेवावे व अर्धी घडी पाडून करंजीचे काठ थोडे दाबून जोडून घ्यावे. त्याला हवा तसा आकार द्यावा. अश्याप्रकारे सर्व करंज्या करून घ्याव्या. करत असताना एक एक करंजी झाली की त्यावर कापड ठेवावे त्यामुळे करंजीचे आवरण वाळून फाटणार नाही. एका कढईत तेल तापवून मध्यम आचेवर सर्व करंज्या दोन्ही बाजूंनी लालसर तळून घ्याव्या. 

Comments