एगलेस ब्ल्याक फॉरेस्ट केक / eggless black forest cake




साहित्य –

१. मैदा २ वाट्या
२. साखर पाउण वाटी
३. कोको पावडर पाव वाटी
४. कॉफी १ चमचा
५. व्हानिला इसेन्स एक छोटा चमचा
६. कॅन चेरीज १०
७. स्वीट व्हिप्ड क्रीम आवश्यकतेनुसार
८. बटर अर्धी वाटी
९. बेकिंग सोडा अर्धा चमचा
१०. बेकिंग पावडर १ चमचा
११. दुध आवश्यकतेनुसार
१२. लिंबाचा रस २ चमचे 
१३. किसलेले कुकिंग चॉकलेट १ वाटी

कृती –

एका भांड्यात १ वाटी दुध घेऊन त्यात साखर ढवळून मिक्स करून घ्यावी. त्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, कोको पावडर बारीक चाळणीने चाळून टाकावे. एकजीव करावे. आता त्यात कॉफी, इसेन्स, बटर वितळवून टाकून एकत्र करावे. केकच्या भांड्याला बटर लावून बुडाला बटर पेपर लावून परत त्यावर बटर लावून ठेवावे. मायक्रोवेव्ह प्रिहीट करून ठेवावा. सगळ्यात शेवटी केकच्या मिश्रणात लिंबाचा रस मिक्स करून मिश्रण लगेच केकच्या भांड्यात टाकून मायक्रोवेव्ह मध्ये हाय हिट वर १५-२० मिनिटे ठेवावे. केक फुगल्यास बाहेर काढून केक मध्ये चाकू टाकून पाहावा. केक चाकुला चिकटल्यास परत ठेवावा. केक शिजल्यावर पूर्णपणे थंड होऊ द्यावा. आता व्हिप्ड क्रीम फेटून घ्यावे. केक मधून आडवा कापून बाजूला ठेवावा. एक वाटी पाणी घेऊन दोन्ही केकच्या भागांवर पसरवून टाकावे. आता खालील केकच्या भागावर फेटलेली क्रीम पसरवावी. व त्यावर चेरीचे तुकडे करून पसरवावे. आता त्यावर दुसरा केकचा भाग ठेवून त्यावर क्रीम पसरवावी. केकच्या बाजूच्या भागावर क्रीम लावून घ्यावी. वरून डेकोरेशन करता चेरी व किसलेले चॉकलेट टाकावे.

Comments