चेट्टीनाड चिकन / chettinad chicken




साहित्य –

१. चिकन अर्धा किलो
२. कांदा १ 
३. टमाटे ३
४. आले लसूण पेस्ट २ चमचे
५. कढीपत्ता २० पाने
६. चिंचेचा कोळ पाव वाटी
७. सुक्या खोबऱ्याचा कीस अर्धी वाटी
८. दालचिनी एक छोटा तुकडा
९. लवंग २
१०. दगडफूल २ चमचे
११. जावित्री अर्धा चमचा
१२. खसखस २ चमचे
१३. जिरे एक चमचा
१४. मोहरी अर्धा चमचा
१५. धने ३ चमचे
१६. बडीशेप एक चमचा
१७. सुकी लाल बेडगी मिरची ३
१८. हळद अर्धा चमचा
१९. तिखट आवश्यकतेनुसार
२०. मीठ चवीनुसार
२१. तेल ६ चमचे
२२. तमालपत्र १
२३. मोठी वेलची अर्धी
२४. मिरे ३
२५. मसाल्याचे फुल अर्धे
२६. हिरवी वेलची १
२७. कोथिंबीर अर्धी वाटी 

कृती –

चिकन धुवून स्वच्छ करून ठेवावे. एका कढईत अर्धा चमचा तेल तापवावे. त्यात मोहरी, जिरे, हिरवी वेलची, मसाल्याचे फुल, मिरे, मोठी वेलची, तमालपत्र, बेडगी मिरची, बडीशेप, धने, खसखस, जावित्री, दगडफूल, लवंग, दालचिनी, खोबऱ्याचा कीस, १० कढीपत्ते एकत्र टाकून एक मिनिट भाजून काढून घ्यावे. त्याच भांड्यात परत अर्धा चमचा तेल टाकून चिरलेला कांदा व टमाटे ३-४ मिनिटे भाजावे. एका मिक्सरच्या भांड्यात वरील मसाला बारीक वाटून घ्यावा. बारीक झाल्यावर त्यात भाजलेला कांदा, टमाटे टाकून परत बारीक वाटून घ्यावे. एका भांड्यात तेल तापवून त्यात कढीपत्ता टाकून वरील वाटलेला मसाला, आले लसूण पेस्ट, तिखट, मीठ, हळद टाकून २ मिनिटे परतावे. आता चिकन व चिंचेचा कोळ टाकून बारीक gas वर १० मिनिटे होऊ द्यावे. मग आवश्यकतेनुसार पाणी टाकून चिकन शिजवून घ्यावे. शिजल्यावर gas बंद करून कोथिंबीर पेरावी.

Comments