काश्मिरी दम आलू / kashmiri dum aloo




साहित्य-

१. छोटे बटाटे १ पाव
२. दही अर्धी वाटी
३. काजूची पेस्ट अर्धी वाटी
४. लवंग ३
५. मोठी वेलची १
६. वेलची २
७. तमालपत्र २
८. दालचिनी २ छोटे तुकडे
९. जिरेपूड अर्धा चमचा
१०. धणेपूड अर्धा चमचा
११. गरम मसाला अर्धा चमचा
१२. तिखट आवश्यकतेनुसार
१३. मीठ चवीनुसार
१४. तेल आवश्यकतेनुसार
१५. कसुरी मेथी अर्धा चमचा
१६. हळद पाव चमचा
१७. एका कांद्याची पेस्ट 
१८. कोथिंबीर अर्धी वाटी
 

कृती –

बटाटे सोलून त्याला काटेरी चमच्याने सगळीकडून टोचून घ्यावे. व तेलात गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यावे. एका भांड्यात दही घेऊन त्यात जिरेपूड, धणेपूड, गरम मसाला, तिखट, कसुरी मेथी, हळद टाकून मिक्स करणे. एका पातेल्यात ४ चमचे तेल घेऊन त्यात वेलची, लवंग, मोठी वेलची, तमालपत्र, दालचिनी टाकून कांद्याची पेस्ट टाकावी. चांगली ब्राऊन होईपर्यंत भाजावी. आता त्यात मसाले एकत्र केलेले दही टाकावे. तेल सुटेपर्यंत भाजावे. आता काजूची पेस्ट टाकून ३-४ मिनिटे होऊ द्यावे. आता तळलेले बटाटे टाकून आवश्यकतेनुसार पाणी व मीठ टाकून ५ मिनिटे बारीक gas वर उकळावे. कोथिंबीर पेरून सर्व्ह करावे.

Comments