दही भेंडी / dahi bhendi




साहित्य –

१. भेंडी १ पाव
२. घट्ट आंबट दही १ वाटी
३. मोहरी पाव चमचा
४. जिरे पाव चमचा
५. धणेपूड अर्धा चमचा
६. गरम मसाला अर्धा चमचा
७. हिरव्या मिरच्या ३
८. हळद पाव चमचा
९. तिखट अर्धा चमचा
१०. मीठ चवीनुसार
११. कढीपत्ता ५-६ पाने
१२. जिरेपूड अर्धा चमचा
१३. आले एक छोटा तुकडा
१४. लसूण पाकळ्या ६
१५. तेल आवश्यकतेनुसार
१६. कांदा एक मोठा
१७. कोथिंबीर अर्धी वाटी 

साहित्य –

भेंडी धुवून कोरडी करून घ्यावी. त्याचे मोठे मोठे काप करावे. एका कढईत तेल घेऊन भेंडी शिजेपर्यंत तळून घ्यावी. कांद्याचे मोठे तुकडे कापून तळून घ्यावे. मिक्सरच्या भांड्यात तळलेला कांदा, आले, लसूण, पाणी टाकून पातळ पेस्ट करून घ्यावी. एका भांड्यात ३ चमचे तेल तापवून त्यात मोहरी, जिरे व कढीपत्ता तडतडू द्यावा. मग मिरच्या व कांद्याची पेस्ट टाकून ३ मिनिटे भाजावे. आता त्यात गरम मसाला, तिखट, धनेपूड, जिरेपूड, हळद, तिखट टाकावे. दही फेटून त्यात थोडे पाणी टाकून कढईत सोडावे. आता तेल सुटेपर्यंत होऊ द्यावे. भाजी आवडीनुसार पातळ करावी. ५ मिनिटांनी तळलेली भेंडी, मीठ टाकून २ मिनिटे शिजू द्यावे. मग कोथिंबीर पेरून दही भेंडी सर्व्ह करावी.

Comments