हरीयाले आलू / potato in green gravy




साहित्य-
१. बटाटे ५
२. कांदे ३
३. तेल आवश्यकतेनुसार
४. मिरच्या ५
५. लसूण पाकळ्या ५
६. आले एक छोटा तुकडा
७. पुदिन्याची पाने १५ 
८. कोथिंबीर अर्धी वाटी
९. पालकाची पाने ६-७
१०. काजू ५
११. खसखस १ चमचा
१२. जायफळ पावडर पाव चमचा
१३. धने पूड अर्धा चमचा
१४. जिरे पूड अर्धा चमचा 
१५. गरम मसाला अर्धा चमचा
१६. साखर अर्धा चमचा
१७. मीठ चवीनुसार
१८. चीज २ क्युब्स
कृती-
बटाट्याची साले काढून त्याचे तुकडे करून गरम पाण्यात ३ मिनिटे उकळून घ्यावे. एका कढईत तेल घेऊन ते तुकडे तळून घ्यावे. एका तव्यावर एक चमचा तेल टाकून चिरलेला कांदा चांगला भाजून घ्यावा. आता हा कांदा, मिरच्या, लसूण, आले, पुदिना, कोथिंबीर, पालक, काजू, खसखस मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे. एका भांड्यात ४ मोठे चमचे तेल घेऊन त्यात वाटलेला मसाला टाकून चांगला परतून घ्यावा. तेल सुटू लागल्यावर त्यात जायफळ पावडर, धने पूड, जिरे पूड, गरम मसाला, साखर, मीठ टाकून १ मिनिट होऊ द्यावे. मग ह्यात तळलेले बटाटे व एक चीज क्यूब किसून टाकावे. gas बंद करून सर्व्ह करताना वरून एक चीज क्यूब किसून टाकावे.   

Comments