गोबी मुसल्लम / gobhi musallam




साहित्य-
१. फुलकोबीचे १ फुल
२. कांदे २
३. मगज बी अर्धी वाटी
४. हळद पाव चमचा
५. तेल आवश्यकतेनुसार
६. मीठ चवीनुसार
७. लसूण-आले पेस्ट २ चमचा
८. जिरे पूड अर्धा चमचा
९. तिखट चवीनुसार
१०. धने पूड एक चमचा
११. गरम मसाला एक चमचा
१२. tomato पेस्ट एक वाटी
१३. फ्रेश क्रीम अर्धा कप
१४. कोथिंबीर अर्धी वाटी
कृती-
मगज बी १ तास पाण्यात भिजत घालावी. कोबीचे मोठे मोठे तुकडे करून ते हळद टाकलेल्या पाण्यात अर्धवट शिजेपर्यंत उकळून घ्यावे, व पाणी काढून टाकावे. कांदा व मगज बी वेगवेगळे मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे. एका भांड्यात ४ मोठे चमचे तेल घेऊन त्यात कांद्याची पेस्ट टाकून चांगली ब्राऊन होईपर्यंत परतावी. आता लसूण-आले पेस्ट, जिरे पूड, धने पूड, तिखट, गरम मसाला टाकून ढवळून घ्यावे. आता tomato पेस्ट टाकून तेल सुटेपर्यंत परतावे. मगज बी पेस्ट टाकून ढवळून घ्यावे. आता एक कप पाणी टाकून ग्रेवी उकळू द्यावी. आता त्यात कोबी टाकून भाजी शिजू द्यावी. शिजल्यावर फ्रेश क्रीम टाकून gas बंद करावा. वर कोथिंबीर पेरावी, व गरम गरम सर्व्ह करावे.   

Comments