छुंदा / chunda


साहित्य-
१. कैऱ्या ५
२. हळद पाव चमचा
३. मीठ चवीनुसार
४. जिरे पूड ३ चमचे
५. तिखट चवीनुसार
६. साखर आवश्यकतेनुसार
कृती-
कैऱ्या किसून घ्याव्या. त्यात हळद, मीठ टाकावे. आता त्याला ४ तास तसेच ठेवावे. आता एका पातेल्यात ठेवून त्याला वरून फडके बांधून उन्हात ४ दिवस ठेवावे. नंतर त्यात साखर (४ वाट्या कैर्यांच्या किसाला ३ वाट्या साखर याप्रमाणे) , जिरे पूड, तिखट टाकून ढवळून घ्यावे. आता एका काचेच्या बरणीत ठेवून द्यावे. हा छुंदा लोणच्यासारखा तोंडी लावण्यास खातात.

Comments