कोबीचे कटलेट / Cauliflower cutlet


साहित्य-
१. बटाटे २
२. कांदे २
३. फुलकोबी अर्धा किलो
४. लसूण पाकळ्या ७-८
५. तिखट चवीनुसार
६. मीठ चवीनुसार
७. तेल आवश्यकतेनुसार
८. कोथिंबीर १ वाटी
९. रवा आवश्यकतेनुसार
१०. टमाटे ३
कृती-
फुलकोबी, कांदे, बटाटे चिरून कुकर मध्ये २ चमचे पाणी टाकून उकडत लावावे. टमाटे चिरून घ्यावे. लसूण ठेचून घ्यावा. आता लसूण व टमाटे एकत्र करून २ चमचे तेलावर फ्राय करून घ्यावे. कुकर मधील भाज्या काढून त्यातील सर्व पाणी पिळून काढून टाकावे. फ्राय केलेले टमाटे, चिरलेली कोथीम्बिर व उकडलेल्या भाज्या एकत्र करून त्यात तिखट मीठ टाकून कुस्करून घ्याव्या. एका ताटलीत रवा घ्यावा. मिश्रणाचा गोळा करून थोडासा हातावर थापून चपटा करावा. तो रव्यात घोळवून घ्यावा. अश्या प्रकारे सर्व कटलेट्स करून घ्यावे. एका तव्यावर २-३ चमचे तेल सोडून कटलेट्स अलगत तव्यावर ठेवावे. परत एकदा बाजूने तेल सोडावे. दोन्ही बाजूनी अश्या प्रकारे खरपूस फ्राय करून गरम गरम सर्व्ह करावे.

Comments

Post a Comment