भापा दोई (दह्याचे पुडिंग) / yogurt pudding

साहित्य - 

१. घट्ट दही ३ वाटी(जास्त आंबट नको)

२. कंडेन्स मिल्क १ वाटी

३. केशर ८-१० काड्या 

४. वेलचीपूड अर्धा चमचा 

५. साजूक तूप १ चमचा 

६. पिस्ता ३-४ सजावटीसाठी

७. बदाम २-३ सजावटीसाठी 


कृती - 

प्रथम एका भांड्यात दही चांगले फेटून घ्यावे. त्यात कंडेन्स मिल्क, वेलचीपूड टाकून एकत्र करावे. आता एकसारख्या ५-६ वाट्या घ्याव्या. त्याला आतून तूप लावून घ्यावे. वाटीच्या आतील खालच्या बाजूला केशरच्या २-३ काड्या ठेवाव्या. आता त्या वाटीत दही हळूहळू ओतावे. वाटी बंद करण्यासाठी अल्युमिनियम फॉईलने झाकावे. अश्या प्रकारे सर्व वाट्या बनवून घ्याव्या. एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळण्यास ठेवावे. त्यावर चाळणी ठेवावी. आता चाळणीवर सर्व वाट्या ठेवून वरतून ताट झाकावे. (स्टीमर मध्ये शिजवले तरी चालेल) १५ मिनिटे वाफेवर शिजू द्यावे. शिजल्यावर फॉईल काढून १ मिनिटे थोडे थंड होऊ द्यावे. मग सर्व्हिंग प्लेट मध्ये ही वाटी हळुवारपणे पालथी करावी. वरतून बदाम आणि पिस्त्याचे पातळ काप टाकावे व सर्व्ह करावे. हे पुडिंग थंड करून सुद्धा खाता येते.

Comments