पपईचे वडे ( papaya fritters )
साहित्य -
१. कच्ची पपई एक छोटी
२. तांदूळ पीठ एक वाटी अंदाजे
३. आले, लसूण, मिरची पेस्ट २ चमचे
४. धणेपूड १ चमचा
५. जिरेपूड अर्धा चमचा
६. मीठ चवीनुसार
७. हळद अर्धा चमचा
८. तीळ ३ चमचे
९. जिरे १ चमचा
१०. तेल तळण्याकरिता
११. कोथिंबीर अर्धी वाटी
कृती -
पपई स्वच्छ धुवून घ्यावी. त्याचे साल व आतील बिया काढून टाकाव्या. आता किसणीने किसून घ्यावे. आता तेल सोडून वरील सर्व साहित्य पपईत टाकावे. नीट एकत्र करावे. त्याचे गोळे हाताने करता येतील एवढेच पीठ टाकावे. पाणी टाकू नये. आता हाताला पाणी लावून त्याचे चपटे वडे थापून घ्यावे. व गरम तेलात खरपूस तळून घ्यावे. हे वडे गरमागरम सॉस बरोबर सर्व्ह करावे.
Comments
Post a Comment