गव्हाच्या पिठाच्या वाटाण्याच्या करंज्या ( matar karanji)
१. वाटणे दीड वाटी
२. कणिक २ वाटी
३. तेल आवश्यकतेनुसार
४. ४ मिरच्यांची पेस्ट
५. आले लसूण पेस्ट १ चमचा
६. मोहरी पाव चमचा
७. जिरे पाव चमचा
८. जिरेपूड अर्धा चमचा
९. धणेपूड अर्धा चमचा
१०. मीठ चवीनुसार
११. हळद पाव चमचा
कृती -
वाटणे अर्धवट मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. एका भांड्यात २ चमचे तेल तापवून त्यात मोहरी व जिरे तडतडू द्यावे. त्यात आले लसूण व मिरची पेस्ट टाकून अर्धा मिनिट परतून हळद टाकून वाटलेले वाटाणे टाकावे. आता धणेपूड, जिरेपूड, मीठ टाकून वाटाणे झाकण ठेवून मंद गॅस वर १५ मिनिटे शिजवून घ्यावे. मधून मधून ढवळत राहावे. शिजल्यावर मिश्रण थंड करून घ्यावे. आता कणकेत चवीप्रमाणे मीठ टाकून एकत्र करावे. ३ चमचे कडकडीत तेलाचे मोहन टाकून नीट एकजीव करून घ्यावे. आता थंड पाण्याने कणिक भिजवून घ्यावी. जास्त सैल भिजवू नये. आता पुरीसाठी घेतो तेवढा गोळा घेऊन त्याची जाडसर पुरी लाटावी. त्यात २ चमचे वाटाण्याचे सारण भरून त्याला करंजीचा आकार द्यावा. व तापलेल्या तेलात अलगद सोडावे. दोन्ही बाजूंनी खरपुस तळून घ्यावे. गरमागरम सॉस बरोबर सर्व्ह करावे.
Comments
Post a Comment