भरले टमाटे / stuffed tomato
साहित्य-
१.
tomato ७-८ लाल व कडक
२.
कांदे २
३.
दाण्याचे कुट अर्धी वाटी
४.
कोरडे खोबरे किसून अर्धी वाटी
५.
गरम मसाला अर्धा चमचा
६.
तिखट आवश्यकतेनुसार
७.
मीठ चवीनुसार
८.
कोथिंबीर अर्धी वाटी
९.
तेल आवश्यकतेनुसार
१०.
आले, लसूण पेस्ट १ चमचा
११.
चीज क्युब्स २
कृती-
कांदे
बारीक चिरून तव्यावर २ चमचे तेल टाकून भाजून घ्यावे. खोबऱ्याचा कीस कोरडाच भाजून
घ्यावा व कांद्यात टाकावा. त्यात दाण्याचे कुट, गरम मसाला, तिखट, मीठ, चिरलेली
कोथिंबीर, आले-लसूण पेस्ट टाकून एकत्र करावे. tomato वरील बाजूने थोडेसे कापून
त्यातील सर्व गर काढून घ्यावा. आता ह्या tomato मध्ये चमच्याची मागील बाजू घालून
gas वर सगळीकडून थोडेसे भाजून घ्यावे. जास्त भाजू नये. वरील मिश्रण त्यात भरावे.
आता प्रत्येक tomato च्या वर चीज किसून टाकावे. व एका कढईत ३-४ चमचे तेल सोडून
त्यात चीज ची बाजू वरच्या भागाला येईल असे tomato अलगद ठेवावे. एकदम बारीक gas वर
फिट्ट झाकण ठेऊन १० मिनिटे होऊ द्यावे. tomato शिजले कि काढून घ्यावे. (चीज
मिश्रणात एकत्र केले तरी चालते)
ओव्हन
मध्ये करायचे असल्यास-
(tomato
gas वर भाजले नाही तरी चालतात). tomato वर चीज किसून टाकल्यावर मायक्रोवेव्ह प्रूफ
प्लेट ३ मिनिटाकरिता ६००w+ग्रील वर प्री हिट करावी. नंतर ३००w वर हाय rack वर ८
मिनिटांकरिता ग्रील करावे.
Comments
Post a Comment