पनीर पकोडा / paneer pakora
साहित्य-
१.
पनीर अर्धा पाव
२.
बेसन १ वाटी
३.
तांदुळाचे पीठ १ वाटी
४.
सोडा पाव चमचा
५.
दही ३ चमचे
६.
मीठ चवीनुसार
७.
तिखट आवश्यकतेनुसार
८.
कसुरी मेथी १ चमचा
९.
तेल तळण्यासाठी
१०.
कोथिंबीर अर्धी वाटी
११.
पाणी आवश्यकतेनुसार
कृती-
पनीरचे
तुकडे करून घ्यावे. त्याला दही, तिखट, मीठ, कसुरी मेथी एकत्र करून चोळून घ्यावी.
एक तास झाकून ठेवावे. एका भांड्यात बेसन, तांदुळाचे पीठ पाण्याने पातळसर भिजवावे.
जास्त पातळ करू नये. त्यात मीठ, तिखट, व कोथिंबीर चिरून टाकावी. वेळेवर सोडा मिक्स
करावा. एका काढईत तेल तापवून घ्यावे. आता पनीरचे तुकडे एक एक करून पिठात घोळवून
तळून काढावे. गरम गरम सॉस बरोबर सर्व्ह करावे.
Comments
Post a Comment