मटार पनीर / matar paneer
साहित्य-
१.
मटार दीड वाटी
२.
पनीर एक वाटी
३.
tomato २
४.
कांदे ३
५.
गरम मसाला अर्धा चमचा
६.
तमालपत्र २
७.
लवंग ४
८.
तिखट चवीनुसार
९.
मीठ चवीनुसार
१०.
तेल ६-७ चमचे
११.
आले लसूण पेस्ट १ चमचा
१२.
कोथिंबीर पाव वाटी
१३.
कसुरी मेथी १ चमचा
१४.
फेटलेले दही ३ चमचे
कृती-
कांदे
बारीक चिरून घ्यावे. तव्यावर १ चमचा तेल टाकून त्यावर खरपूस भाजून घ्यावे. एका
भांड्यात tomato बुडतील एवढे पाणी घ्यावे. त्यात tomato टाकून पाण्यातून वाफ येईल
इतके गरम करून gas बंद करावा व tomato काढून घ्यावे. त्या tomato ची साले काढून
त्याच्या मोठ्या फोडी करून मिक्सर मध्ये कांद्यासोबत फिरवून बारीक पेस्ट करावी. एका
पातेल्यात तेल गरम करून घ्यावे. त्यात तमालपत्र व लवंग टाकावी. व लगेच तयार पेस्ट
टाकावी. आता त्यात गरम मसाला, तिखट, आले लसूण पेस्ट, कसुरी मेथी व मटार टाकून मंद
gas वर झाकण ठेऊन १० मिनिटे होऊ द्यावे. मधून मधून ढवळत रहावे. नंतर झाकण काढून
त्यात मीठ, दही व पनीरचे तुकडे टाकून परत २ मिनिटे वाफ काढून घ्यावी. (आवडत
असल्यास चवीपुरती पाव चमचा साखर टाकावी) मग gas वरून खाली उतरवून कोथिंबीर पेरावी
व तंदुरी रोटी बरोबर सर्व्ह करावे.
Comments
Post a Comment