कच्च्या केळ्याचे कटलेट्स (raw banana cutlets)



साहित्य- 

१. कच्ची केळी 3
२. कांदा १ 
३. कोथिंबीर अर्धी वाटी 
४. मीठ चवीनुसार
५. धणेपूड १ चमचा 
६. जिरेपूड अर्धा चमचा 
७. कॉर्नफ्लोअर २ चमचे 
८. बेसन १ चमचा 
९. बटाटा १
१०. तेल आवश्यतेनुसार
११. मिरची, आले, लसूण पेस्ट दीड चमचा 
१२. चाट मसाला १ चमचा
१३. हळद अर्धा छोटा चमचा

कृती - 

एका कूकरच्या भांड्यात 3 चमचे पाणी टाकून त्यात केळी व बटाटा ठेऊन 3 शीट्या होईपर्यंत शिजवून घ्यावी. आता थंड झाल्यावर साल काढून स्मॅश करून त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालावी. मीठ, जिरेपूड, धणेपूड, चाटमसाला, कॉर्नफ्लोअर, बेसन, हळद, मिरची पेस्ट टाकून एकजीव करावे. त्याचे गोळे करून हवा तो आकार द्यावा. आता नॉनस्टिक पॅन वर थोडे तेल सोडून गरम झाल्यावर मिडीयम आचेवर दोन्ही बाजूंनी कटलेट भाजून घ्यावे. (कटलेट तेलात तळले तरी चालतात). पुदिना चटणी बरोबर गरम गरम सर्व्ह करावे. 

Comments