लिंबाचं औषधी काळं लोणचं (lemon pickle)

साहित्य -

१. मोठे पिवळे लिंबं २५ 

२. मीठ पाऊण वाटी

३. साखर २ वाटी 

४. तिखट चवीनुसार 

५. खजूर १० 

कृती - 

सगळ्यात आधी लिंबं स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यावी. आता हव्या तश्या फोडी कराव्यात. एक काचेच्या बरणीत भरून त्यात मीठ टाकून कालवून ठेवावे. हे जवळपास २० ते २५ दिवस असेच मुरण्यास ठेवावे. नंतर एक फोड खाऊन पहावी. ती पूर्णपणे मुरली असेल तरच त्यात तिखट, साखर, खजुराचे तुकडे करून टाकावे. आता नीट एकत्र करून मुरू द्यावे. मधून मधून ढवळून घ्यावे. हे लोणचे असेच २-३ वर्ष ठेवल्यास काळे व औषधी होते. हे लोणचे उपवासाला चालते तसेच अजारी माणसाला सुद्धा चालते. 

Comments